Breaking News

तुर्भेतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाविरोधात शिवसेना शिंदे आक्रमक

तुर्भेतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाविरोधात शिवसेना शिंदे आक्रमक

विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह नगरसेवकांचा डंपिंग ग्राउंडला पाहणी दौरा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नागरिकांच्या समस्या मांडणार

नवी मुंबई ।तुर्भे डंपिंग ग्राउंड हटविण्यासह प्रस्तावित वेस्ट-टू-एनर्जी आणि सीबीजी प्रकल्पाला स्थानिक पातळीवर पुन्हा एकदा विरोध तीव्र झाला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी तुर्भे डंपिंग ग्राउंडला भेट देत पाहणी केली.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक द्वारकानाथ भाईर, नगरसेवक तथा उपजिल्हाप्रमुख सुरेश कुलकर्णी, नगरसेविका अबोली कुलकर्णी, सविताताई लगाडे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विजय चौगुले यांनी प्रशासन आणि प्रकल्प समर्थकांविरोधात आक्रमक भूमिका घेत, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची आणि पर्यावरणाची किंमत मोजून कोणताही प्रकल्प स्वीकारला जाणार नाही, असा इशारा दिला. तुर्भे डंपिंग ग्राउंड तसेच प्रस्तावित प्रकल्पामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरेश कुलकर्णी म्हणाले की, तुर्भे परिसर आधीच डंपिंग ग्राउंड आणि प्रदूषणाच्या समस्यांनी त्रस्त आहे. अशा परिस्थितीत येथे वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प सुरू केल्यास स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही व्यक्ती प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नागरिकांच्या हिताशी तडजोड करणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही. स्थानिक नागरिकांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावित वेस्ट-टू-एनर्जी आणि सीबीजी प्रकल्पाचा परिणाम परिसरातील नागरिकांसोबतच झोपडपट्टी पुनर्वसन योजनांवरही होऊ शकतो, असा दावा सुरेश कुलकर्णी यांनी केला. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या हितांकडे दुर्लक्ष करून कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

ज्येष्ठ नगरसेवक द्वारकानाथ भाईर यांनी प्रशासनाने प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांच्या हरकती तसेच पर्यावरणीय परिणामांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली. प्रकल्प जबरदस्तीने राबविण्याचा प्रयत्न झाल्यास तुर्भेतील नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले की, तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी एमआयडीसी परिसरात प्रकल्पासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्याचे सुचविले होते. यासंदर्भात सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेने बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असेही सांगण्यात आले होते. मात्र, हा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले.

तुर्भे डंपिंग ग्राउंड, प्रस्तावित वेस्ट-टू-एनर्जी आणि सीबीजी प्रकल्प तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी शिवसेना नेते आणि नगरसेवकांनी केली आहे.


Most Popular News of this Week

व्यसनों से दूर रहकर शिक्षा,...

नवी मुंबई में ‘कैंपस कनेक्ट’ अभियान का मुख्यमंत्री के हाथों शुभारंभनवी...

27 मंजिल तक पहुंचेगा ड्रोन,...

नवी मुंबई। तेजी से विकसित हो रहे नवी मुंबई शहर में गगनचुंबी इमारतों की...

नवी मुंबई में 2.71 लाख से अधिक...

नवी मुंबई, 25 अगस्त 2026: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र में आयुष्मान...