Breaking News

आमरण उपोषणावर बसलेल्या आंदोलनकर्त्याच्या आईची तुर्भे स्टोअर येथे क्रूर हत्या; पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरू

आमरण उपोषणावर बसलेल्या आंदोलनकर्त्याच्या आईची तुर्भे स्टोअर येथे क्रूर हत्या; पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरू

नवी मुंबई : तुर्भे स्टोअर परिसरात एका ६० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव श्रीमती अजरुनीसा खान (वय ६० वर्षे) असे असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजरुनीसा खान यांचा मृतदेह तुर्भे स्टोअर परिसरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तुर्भे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला.

विशेष म्हणजे, मृत महिलेचा मुलगा अब्दुल खान हा तुर्भेतील डंपिंगच्या विरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणावर बसलेला आहे. त्यामुळे या घटनेला अधिक संवेदनशील व गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

तुर्भे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. विविध पथकांमार्फत आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, तांत्रिक तसेच स्थानिक माहितीच्या आधारे तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी आज सकाळी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तपासासंबंधी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद माहिती असल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


Most Popular News of this Week

व्यसनों से दूर रहकर शिक्षा,...

नवी मुंबई में ‘कैंपस कनेक्ट’ अभियान का मुख्यमंत्री के हाथों शुभारंभनवी...

नवी मुंबई में 2.71 लाख से अधिक...

नवी मुंबई, 25 अगस्त 2026: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र में आयुष्मान...

27 मंजिल तक पहुंचेगा ड्रोन,...

नवी मुंबई। तेजी से विकसित हो रहे नवी मुंबई शहर में गगनचुंबी इमारतों की...