Breaking News

एपीएमसी फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण; नागरिकांसह वाहनचालक त्रस्त

एपीएमसी फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण; नागरिकांसह वाहनचालक त्रस्त

शीतल वाघमारे

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अवैध फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने नागरिकांसह वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. फेरीवाल्यांनी रस्त्याच्या कडेला तसेच प्रवेशद्वाराच्या परिसरात जागा व्यापल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अनेकदा वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे.

एपीएमसी फळ मार्केटमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहनांची ये-जा सुरू असते. त्यातच प्रवेशद्वाराजवळील अतिक्रमणामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना अडचणी येत आहेत. पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून मार्ग काढताना त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास असूनही नवी मुंबई महानगरपालिकेकडून अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन नेमकी कारवाई कधी करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एपीएमसी फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण तातडीने हटवून परिसर वाहतूक आणि नागरिकांसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.


Most Popular News of this Week

व्यसनों से दूर रहकर शिक्षा,...

नवी मुंबई में ‘कैंपस कनेक्ट’ अभियान का मुख्यमंत्री के हाथों शुभारंभनवी...

27 मंजिल तक पहुंचेगा ड्रोन,...

नवी मुंबई। तेजी से विकसित हो रहे नवी मुंबई शहर में गगनचुंबी इमारतों की...

नवी मुंबई में 2.71 लाख से अधिक...

नवी मुंबई, 25 अगस्त 2026: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र में आयुष्मान...