Breaking News

सुरेशजी कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त तुर्भेत भव्य रक्तदान व नेत्रशिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सुरेशजी कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त तुर्भेत भव्य रक्तदान व नेत्रशिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

नवी मुंबई : तुर्भे विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक व शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा. श्री. सुरेशजी कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त तुर्भे शिवसेना शाखा क्र. १ येथे दयावान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भव्य दिव्य रक्तदान शिबीर व नेत्रशिबीराचे आयोजन करण्यात आले.

नवी मुंबई तसेच तुर्भे विभागात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय, वाशी यांच्या सहकार्याने तसेच युवा बेलापूर विधानसभा अध्यक्ष महेश सुरेशजी कुलकर्णी यांच्या नेतृत्वात दयावान चॅरिटेबल ट्रस्ट व युवासेना तुर्भे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले.

या रक्तदान व नेत्रशिबीरात तुर्भे विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आणि शिबिराची शोभा वाढवली.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेशजी कुलकर्णी यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाचे तसेच रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

कार्यक्रमास तुर्भे विभागातील नागरिक, सार्वजनिक रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week

तुर्भे MIDC HP रोड पर भीषण सड़क...

नवी मुंबई तुर्भे MIDC स्थित HP रोड पर रविवार देर रात करीब 11 बजे एक भीषण सड़क हादसा...

वाशी अग्निशमन दल और शंकर...

नवी मुंबई।नवी मुंबई महानगरपालिका के वाशी अग्निशमन दल के जवानों तथा नवी...

घनसोली हत्याकांड के गवाह की...

शिकायतकर्ता को भी मिल रही धमकियां; पुलिस कार्रवाई की मांग तेजनवी...

पहली बारिश ने बढ़ाई किसानों...

नवी मुंबई। मानसून की पहली तेज बारिश ने जहां लोगों को गर्मी से राहत दी है,...

पहली ही बारिश में डगमगाई...

नवी मुंबई।मानसून की पहली ही बारिश ने मध्य रेलवे की तैयारियों की हकीकत सामने...