Breaking News

येऊर वनक्षेत्रात जखमी बिबट्याचे थरारक रेस्क्यू

येऊर वनक्षेत्रात जखमी बिबट्याचे थरारक रेस्क्यू


मुंबई (प्रतिनिधी):संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या येऊर वनपरिक्षेत्रात 30 मे 2026 रोजी सायंकाळी एक जखमी बिबट्या झाडावर बसलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली होती.
गस्ती दरम्यान वनकर्मचारी आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या जवानांना हा बिबट्या दिसून आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. उपसंचालक (उत्तर) येऊर आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह टीमने घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्याच्या हालचालींवर मर्यादा आल्याचे स्पष्ट झाले.
रात्र असल्याने तात्काळ कारवाई शक्य नसल्याने संपूर्ण रात्रभर त्या बिबट्यावर देखरेख ठेवण्यात आली.

 सकाळी सुरू झाली रेस्क्यू मोहीम
31 मे रोजी सकाळी 6 वाजता शोध व बचाव मोहीम सुरू करण्यात आली. बिबट्या मूळ ठिकाणापासून सुमारे 70–80 मीटर अंतरावर झाडीत जखमी अवस्थेत पडलेला आढळला.
जखमी आणि अशक्त स्थितीमुळे त्याला जाळीने पकडणे शक्य नसल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले.

 गंभीर जखमा आढळल्या
तपासणीत हा बिबट्या अंदाजे 4 ते 5 वर्षांचा नर असल्याचे स्पष्ट झाले.चारही पायांच्या तळव्यांवर जखमा मागील पायावर गंभीर जखम, हाड उघडे अंगावर आणि शेपटीवर व्रण


???? संयुक्त पथकाची यशस्वी कारवाई
ही मोहीम वनसंरक्षक व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली, उपसंचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, जलद बचाव पथक, ठाणे वन विभाग तसेच WWA आणि RAWW संस्थांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडली.

???? पुढील उपचार सुरू
जखमी बिबट्याची प्राथमिक तपासणी करून त्याला पुढील उपचारासाठी बिबट रेस्क्यू सेंटर येथे हलविण्यात आले आहे.वेळीच मिळालेल्या माहितीमुळे आणि वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे एका जखमी वन्यप्राण्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.



Most Popular News of this Week

तुर्भे MIDC HP रोड पर भीषण सड़क...

नवी मुंबई तुर्भे MIDC स्थित HP रोड पर रविवार देर रात करीब 11 बजे एक भीषण सड़क हादसा...

वाशी अग्निशमन दल और शंकर...

नवी मुंबई।नवी मुंबई महानगरपालिका के वाशी अग्निशमन दल के जवानों तथा नवी...

घनसोली हत्याकांड के गवाह की...

शिकायतकर्ता को भी मिल रही धमकियां; पुलिस कार्रवाई की मांग तेजनवी...

पहली बारिश ने बढ़ाई किसानों...

नवी मुंबई। मानसून की पहली तेज बारिश ने जहां लोगों को गर्मी से राहत दी है,...

पहली ही बारिश में डगमगाई...

नवी मुंबई।मानसून की पहली ही बारिश ने मध्य रेलवे की तैयारियों की हकीकत सामने...