Breaking News

खारघर (नवी मुंबई) येथे शस्त्राच्या धाकावर दरोडा; ३ दिवसांत २ आरोपी जेरबंद, एक फरार

खारघर (नवी मुंबई) येथे शस्त्राच्या धाकावर दरोडा; ३ दिवसांत २ आरोपी जेरबंद, एक फरार

नवी मुंबई: खारघर परिसरात राहणारे सुशांत नामदेव मोरे यांच्यावर घराजवळ कार पार्किंग करत असताना तिघा अज्ञात आरोपींनी चाकूने हल्ला करून व पिस्तुलाचा धाक दाखवून सुमारे ४० लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपींनी तेथून पलायन केले.

या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच टोल नाक्यांवरील कॅमेऱ्यांची तपासणी करून संशयित वाहनाचा माग काढण्यात आला. तपासात आरोपी साताऱ्याकडे, पुढे महाबळेश्वरच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले.

तपासादरम्यान सांगली येथील मुख्य आरोपी हर्षद सागरे याला मोरे यांच्या वाईन शॉप विक्री व्यवहाराची माहिती मिळाल्याचे समोर आले. त्याने खटाव तालुक्यातील अंबवडे व दातेवाडी येथील शुभम धनाजी पाटोळे (वय २०) आणि संदीप कृष्णदेव गुजले (वय २०) यांना सोबत घेऊन हा गुन्हा केल्याचे उघड झाले.

पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. मायणी व गुरसाळे परिसरात आरोपींचा माग काढत वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पाठलाग करून शुभम पाटोळे व संदीप गुजले या दोघांना अटक केली. मात्र मुख्य आरोपी हर्षद सागरे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी लुटीतील काही रक्कम वाटून घेतली होती आणि उर्वरित रक्कम नंतर वाटण्याचा त्यांचा विचार होता. या प्रकरणात एका स्थानिक व्यक्तीने आरोपींना वाहन उपलब्ध करून दिल्याची बाब समोर आली असली तरी त्याचा गुन्ह्यात थेट सहभाग नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल आणि पुढील तपास सुरू आहे.


Most Popular News of this Week

नवी मुंबईत ‘कोयता गँग’ची...

19 वर्षीय तरुणाची डोक्यात वार करून निर्घृण हत्या; आरोपी फरारशीतल वाघमारेनवी...

27 मंजिल तक पहुंचेगा ड्रोन,...

नवी मुंबई। तेजी से विकसित हो रहे नवी मुंबई शहर में गगनचुंबी इमारतों की...

नवी मुंबई में 2.71 लाख से अधिक...

नवी मुंबई, 25 अगस्त 2026: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र में आयुष्मान...

नशे के कारोबार पर नवी मुंबई...

4 महिला तस्करों पर 22 केस, एक पर MCOCA; दो जेल में, एक महाराष्ट्र से बाहर!नवी मुंबई:...