Breaking News

तुर्भे एमआयडीसीमध्ये भंगार माफिया सर्वेंद्र सिंग उर्फ ठाकूरची दहशत?

तुर्भे एमआयडीसीमध्ये भंगार माफिया सर्वेंद्र सिंग उर्फ ठाकूरची दहशत?

तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरेच्या आशीर्वादाने ठाकूर ने तयार केले झोपडे

अवैध झोपड्यांपासून चोरी-लुटीपर्यंत गंभीर आरोप, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

नवी मुंबई: तुर्भे एमआयडीसी परिसरात भंगार व्यवसायाशी संबंधित सर्वेंद्र सिंग उर्फ ठाकूर याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, एमआयडीसी परिसरात कथितरित्या अवैध झोपड्या उभारून त्यामध्ये बाहेरील व्यक्ती आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या लोकांना आश्रय दिला जात आहे.

या अवैध झोपड्यांमध्ये राहणाऱ्या काही व्यक्तींकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरी आणि लुटमारीच्या घटना घडवल्या जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी घरी जात असलेल्या एका तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्यासोबत मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही स्थानिकांकडून करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सर्वेंद्र सिंग उर्फ ठाकूर याच्याविरोधात यापूर्वीही चोरी आणि लुटमारीशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्यावर तडीपारची कारवाई करण्याचा प्रस्ताव असल्याचीही चर्चा आहे. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

काही महिन्यांपूर्वी उरण परिसरात भंगार चोरीच्या कथित प्रकरणावरूनही वाद निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एका वाहनातून कथितरित्या घातक शस्त्रे आढळून आली होती. यावेळी झालेल्या वादात सुकरू नावाचा एक तरुण जखमी झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.

आता थेट प्रश्न तुर्भे विभाग कार्यालय आणि पोलिस प्रशासनाला आहे—एमआयडीसी परिसरातील कथित अवैध झोपड्यांवर आणि गुन्हेगारी कारवायांवर कारवाई होणार का? की भंगार माफियाला प्रशासनाचा कथित वरदहस्त कायम राहणार?स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून, अवैध बांधकाम आणि गुन्हेगारी कारवायांची पुष्टी झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, तुर्भे विभाग अधिकारी सागर मोरे या कथित अवैध बांधकामांवर कारवाईचा हातोडा चालवणार की कारवाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला जाणार?


Most Popular News of this Week

घणसोलीतील अवैध...

रोहित ठाकरे यांच्या कार्यकाळाची उच्चस्तरीय चौकशी करा! गणेश सकपाळ यांच्या...

पनवेल में MD ड्रग्स मामले में...

नवी मुंबई। पनवेल शहर पुलिस ने नशीले पदार्थों के खिलाफ कार्रवाई करते हुए MD...

तुर्भे स्टोअर में जानलेवा...

नवी मुंबई। तुर्भे स्टोअर चौक पर सड़क पार करना लोगों के लिए जानलेवा साबित हो...

नवी मुंबई में ‘युगंधरा युवती...

नवी मुंबई। युवतियों के व्यक्तित्व विकास, स्वास्थ्य जागरूकता, आत्मरक्षा,...

हृदय के पीछे मौजूद 18 सेंटीमीटर...

नवी मुंबई। खारघर स्थित मेडिकवर अस्पताल के डॉक्टरों ने 57 वर्षीय महिला की...