Breaking News

अनधिकृत बांधकामांचे पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

अनधिकृत बांधकामांचे पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

पनवेल महापालिका हद्दीतील अतिक्रमण
पनवेल / प्रतिनिधी
     पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन १० वर्षे झाली मात्र अद्यापही पनवेल महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजे या परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे वाढतच चाललेली दिसून येत आहेत. काही बांधकामे तर पनवेल महानगरपालिकेची परवानगी न घेता बिनधास्तपणे सुरु आहेत. तसेच अनेक ठिकाणी फुटपाथ काबीज करून, मार्जिनल स्पेसचा गैरवापर करून व्यवसाय, हातगाड्या, बेकायदेशीर खाद्य पदार्थांची दुकाने यांचे प्रमाण वाढीस लागले असून यामध्ये प्रभाग समिती अधिकारी, अधीक्षक, पर्यवेक्षक, आयुक्त - उपायुक्त अधिकारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध दिसून येत आहेत. त्यामुळेच अशा धंद्यांवर कायमस्वरूपी कारवाई होताना दिसून येत नाही. याबाबत अनेकदा पत्रकार मित्र असोसिएशन व स्थानिक वृत्तपत्र यांनी आवाज उठवला असून त्यामध्ये फक्त थातुरमातुर कारवाई होत असल्याने आता पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे सोमवार दिनांक २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १. ०० वाजता पनवेल महानगरपालिका कार्यालयासमोर पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम यांचे भव्य छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार असून पनवेल महानगरपालिका हद्दीतील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे यांचे फोटो असतील तरी आजच ९३२२२८२२२७ या क्रमांकावर पठवावे अथवा asociationpatrakarmitra@gmail.com यावर पाठवण्याचे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.


Most Popular News of this Week

पाम बीच रोड पर मानव शृंखला,...

नवी मुंबई | नवी मुंबई में रविवार को पाम बीच रोड पर सैकड़ों नागरिकों और...

वाशी सेक्टर 30 हाइवे ब्रिज के...

वाशी पुलिस ने शिकायत दर्ज कर शुरू की जांच नवी मुंबई|वाशी सेक्टर 30 हाइवे...

अनधिकृत बांधकामांचे पत्रकार...

पनवेल महापालिका हद्दीतील अतिक्रमणपनवेल / प्रतिनिधी     पनवेल...

खाड़ी देशों में तनाव के बीच ISIS...

 गोवंडी–कुर्ला से ATS ने तीन युवकों को हिरासत में लिया मुंबई | डिजिटल...