Breaking News

बजरंग दलाविषयी अपशब्द वापरणाऱ्यास चोप; पोलिसात तक्रार

बजरंग दलाविषयी अपशब्द वापरणाऱ्यास चोप; पोलिसात तक्रार

नवी मुंबई - समाज माध्यमावर बजरंग दलाविषयी शब्द वापरणाऱ्याला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चोप देऊन त्याला पोलीस ठाण्यात नेले. नुरआलम आसिफ शेख (वय २४) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. 

बजरंगदलाचे नवी मुंबई जिल्हा सहसंयोजक तेजस पाटील यांना १८ सप्टेंबर या दिवशी इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने मध्यप्रदेश मधील कोणत्यातरी घटनेवरून "बजरंग दल कोई तीस मार खा नही है, ये आंडू पांडू लोक है, झंडू लोक है, इनकी कोई औकात नही है, ये सारे कुत्ते लोगो को सरकारने खुल्ला छोडा हे !, असा व्हिडिओ प्रसारित केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पाटील यांनी बजरंग दलाची बदनामी करून शिविगाळ केल्याची तक्रार पाटील यांनी सदर व्यक्ती विरूद्ध नेरूळ पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली होती. दरम्यानच्या काळात वरील व्यक्ती नुरआलम आसिफ शेख (वय २४) असून तो सारसोळे रहात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. शेख याच्याकडून नेहमीच समाज माध्यमावर हिंदू - मुस्लिम विषयांवर व्हिडिओ प्रदर्शित करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. याच कारणाने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. तसेच त्याला माफी मागण्यास भाग पाडले.  या आरोपीला पोलिसांनी कह्यात घेतले असून पुढील  कारवाई केली जात आहे.


Most Popular News of this Week

???? स्वतंत्र भारत डिजिटल...

 सुरक्षा रक्षक गायब, तलाव बनला मृत्यूचा सापळा!## नवी मुंबईत दोन...

घणसोलीतील अवैध...

रोहित ठाकरे यांच्या कार्यकाळाची उच्चस्तरीय चौकशी करा! गणेश सकपाळ यांच्या...

रायगढ़ जिले में पहली बार...

पनवेल। रायगढ़ जिले में पहली बार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी...

नेरुळ रेल्वे स्टेशनबाहेर...

२१ वर्षीय तरुणी मृत्यूशी झुंजतेय; पूर्वी मारहाणीच्या तक्रारी, तरीही...

पनवेल में MD ड्रग्स मामले में...

नवी मुंबई। पनवेल शहर पुलिस ने नशीले पदार्थों के खिलाफ कार्रवाई करते हुए MD...

नवी मुंबई में ‘युगंधरा युवती...

नवी मुंबई। युवतियों के व्यक्तित्व विकास, स्वास्थ्य जागरूकता, आत्मरक्षा,...