Breaking News

वाशी मनपा रुग्णालयाच्या आवारातील मेडिकलमध्ये मनमानी? रुग्णांशी लूट!

वाशी मनपा रुग्णालयाच्या आवारातील मेडिकलमध्ये मनमानी? रुग्णांशी लूट!

पैसे पूर्ण, पण बिल देण्यास टाळाटाळ!

महापौर मॅडम आणि मनपा आयुक्त साहेब—रुग्णांची अशी लूट सुरू आहे, याची दखल घेणार का?

नवी मुंबई ।मंगळवारी संध्याकाळी माझ्या डोळ्यात काही कचरा गेला होता. त्यामुळे डोळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. बुधवारी सकाळी उपचारासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात गेलो. तेथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार करून डोळ्यातील कचरा काढला. त्यामुळे मला मोठा दिलासा मिळाला.

डोळ्याला सूज असल्याने डॉक्टरांनी काही औषधे आणि दोन आय ड्रॉप्स लिहून दिले. त्यापैकी एक ड्रॉप मनपा रुग्णालयातून मिळाला; मात्र दुसरा ड्रॉप उपलब्ध नव्हता. त्यामुळे नाईलाजाने रुग्णालयाच्या आवारात सुरक्षा रक्षकांच्या गेटजवळ असलेल्या मेडिकलमधून तो ड्रॉप घ्यावा लागला. त्या औषधाची किंमत ₹375 होती.

औषध घेतल्यानंतर मी मेडिकलमधील कर्मचाऱ्याकडे बिल मागितले. मात्र बिल देण्यात आले नाही. त्याचवेळी मी मनपा रुग्णालयातील रुग्णांना काही सवलत किंवा डिस्काउंट दिला जातो का, असा सवाल केला. त्यावर उपस्थित कर्मचाऱ्याने कथितपणे सांगितले की, "याचा पालिकेशी काहीही संबंध नाही, तुम्हाला जिथे तक्रार करायची आहे तिथे करा."

वा रे व्यवस्था!

जर या मेडिकलचा मनपाशी कोणताही संबंध नाही, तर मग हे मेडिकल मनपा रुग्णालयाच्या आवारात कोणाच्या परवानगीने सुरू आहे? रुग्णालय परिसरात मेडिकल सुरू करण्याची परवानगी कोणी दिली? त्याची तपासणी आणि देखरेख कोण करते?

मी या प्रकाराचा व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याच्या बोलण्याच्या पद्धतीतही अचानक बदल झाला.

आता थेट सवाल मनपा प्रशासनाला—

???? मनपा रुग्णालयाच्या आवारातील या मेडिकलची चौकशी होणार का?

???? रुग्णांकडून औषधांचे पैसे घेताना प्रत्येक वेळी अधिकृत बिल दिले जाते का?

???? औषधांची एमआरपी आणि विक्री किंमत तपासली जाते का?

???? मनपा रुग्णालयातील रुग्णांना औषधांवर काही सवलत दिली जाते का?

???? आणि जर या मेडिकलचा मनपाशी काहीही संबंध नसेल, तर ते रुग्णालयाच्या आवारात सुरूच कसे आहे?

महापौर मॅडम आणि मनपा आयुक्त साहेब, आता जनतेला उत्तर द्यावे लागेल!

गरीब आणि सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी मनपा रुग्णालयात येतात. अशा परिस्थितीत रुग्णालयाच्या आवारातच औषधांसाठी रुग्णांना बाहेर धावपळ करावी लागणे, बिल मागितल्यानंतरही बिल न मिळणे आणि मेडिकलचा मनपाशी संबंध नसल्याचे सांगितले जाणे—हा अत्यंत गंभीर विषय आहे.

मनपा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी.रुग्णांची मजबुरी हा कोणाच्याही नफ्याचा व्यवसाय बनता कामा नये!




Most Popular News of this Week

27 मंजिल तक पहुंचेगा ड्रोन,...

नवी मुंबई। तेजी से विकसित हो रहे नवी मुंबई शहर में गगनचुंबी इमारतों की...

नवी मुंबई में 2.71 लाख से अधिक...

नवी मुंबई, 25 अगस्त 2026: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र में आयुष्मान...

नशे के कारोबार पर नवी मुंबई...

4 महिला तस्करों पर 22 केस, एक पर MCOCA; दो जेल में, एक महाराष्ट्र से बाहर!नवी मुंबई:...