Breaking News

वाशी येथील बांधकाम साईटवर कामगाराचा मृत्यू; मनाई आदेशाचे उल्लंघन? चौकशी व कारवाईची मागणी

वाशी येथील बांधकाम साईटवर कामगाराचा मृत्यू; मनाई आदेशाचे उल्लंघन? चौकशी व कारवाईची मागणी

नवी मुंबई । वाशी सेक्टर ९ येथील अरिहंत बिल्डरच्या बांधकाम साईटवर एक दुर्दैवी घटना घडली असून, २७ व्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सदर कामगार पीओपीचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला मनपा रुग्णालय, वाशी येथे दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित साईटवर कामगार विभागाकडून मनाई आदेश (Stop Work Notice) जारी असतानाही काम सुरू असल्याचा आरोप समोर येत आहे. जर हा आरोप खरा असेल, तर हे केवळ निष्काळजीपणाचे नव्हे तर कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे.

स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांनी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मृत कामगाराच्या कुटुंबीयांना तातडीने योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.

यासोबतच, नवी मुंबईतील इतर बांधकाम साईट्सवरही सुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे का, याची तपासणी करून मोठ्या प्रमाणात मोहीम राबवावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

ही घटना पुन्हा एकदा बांधकाम साईटवरील कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आणते. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कठोर पावले उचलणे अत्यावश्यक आहे.


Most Popular News of this Week

???? स्वतंत्र भारत डिजिटल...

 सुरक्षा रक्षक गायब, तलाव बनला मृत्यूचा सापळा!## नवी मुंबईत दोन...

घणसोलीतील अवैध...

रोहित ठाकरे यांच्या कार्यकाळाची उच्चस्तरीय चौकशी करा! गणेश सकपाळ यांच्या...

रायगढ़ जिले में पहली बार...

पनवेल। रायगढ़ जिले में पहली बार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी...

नेरुळ रेल्वे स्टेशनबाहेर...

२१ वर्षीय तरुणी मृत्यूशी झुंजतेय; पूर्वी मारहाणीच्या तक्रारी, तरीही...

पनवेल में MD ड्रग्स मामले में...

नवी मुंबई। पनवेल शहर पुलिस ने नशीले पदार्थों के खिलाफ कार्रवाई करते हुए MD...

नवी मुंबई में ‘युगंधरा युवती...

नवी मुंबई। युवतियों के व्यक्तित्व विकास, स्वास्थ्य जागरूकता, आत्मरक्षा,...