Breaking News

ठाणे जिल्ह्यातील मतदार यादी पुनरीक्षणासाठी मुदतवाढीची मागणी

ठाणे जिल्ह्यातील मतदार यादी पुनरीक्षणासाठी मुदतवाढीची मागणी

ठाणे | ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) प्रक्रियेसाठी मुदत २४ मे २०२६ पर्यंत वाढविण्याची मागणी संतोष श्रीमंत जाधव यांनी केली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा पहिला टप्पा राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांच्या नावांचे ‘मॅपिंग’ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ही मॅपिंग प्रक्रिया दि. ११ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून आज त्याची मुदत संपत आहे. या मोहिमेत दोन पद्धतींनी मॅपिंग केले जात आहे. सन २००२ च्या मतदार यादीत आधीपासून समाविष्ट असलेल्या मतदारांचे ‘पर्सन टू पर्सन’ मॅपिंग केले जात आहे, तर नव्याने समाविष्ट मतदारांचे ‘प्रोजेनी मॅपिंग’ त्यांच्या पालक किंवा आजी-आजोबांच्या २००२ मधील नोंदींच्या आधारे करण्यात येत आहे.

ही प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, अल्प कालावधीमुळे सर्व मतदारांचे योग्य मॅपिंग पूर्ण होणे कठीण असल्याने या प्रक्रियेस २४ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी संतोष जाधव यांनी केली आहे.


Most Popular News of this Week

ठाणे जिल्ह्यातील मतदार यादी...

ठाणे | ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

नवी मुंबई महापालिकेत...

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत...

पनवेल रेलवे स्टेशन पर लिफ्ट...

नवी मुंबई । पनवेल रेलवे स्टेशन पर आज एक गंभीर घटना सामने आई है। स्टेशन के...

नवी मुंबई मनपातील...

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील अलीकडील प्रशासनिक व राजकीय...

चलती ट्रेन में वारदात से पहले...

मुंबई। मध्य रेलवे के सोलापुर मंडल में रेलवे सुरक्षा बल (RPF) ने एक बड़ी आपराधिक...

गोपालगंज में दो साल बाद मिला...

नाले से मिला नर कंकाल, दो साल बाद खुला हत्या का राज; प्रेम प्रसंग में युवक की...